Share

९० हजारांचा पगार आणि ५ लक्झरी गाड्या! हायकोर्टाने सचिन वाझेंना घेरले, प्रशासनालाही फटकारले

९० हजारांच्या पगारात ५ आलिशान गाड्या कशा? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात प्रशासनाला फटकारले.

Published On: 

Sachin Vaze luxury cars Bombay high court hearing

मुंबई, 9 ऑक्टोबर: बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सचिन वाझे यांच्याकडे असलेल्या अफाट संपत्ती आणि आलिशान गाड्यांच्या ताफ्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. अवघ्या ९० हजार रुपये मासिक पगार असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याकडे एवढ्या महागड्या गाड्या आल्या कुठून, असा खडा सवाल उपस्थित करत न्यायालयाने तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला कडक शब्दांत धारेवर धरले. वाझे यांच्या जामीन अर्जावर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे ताशेरे ओढले.

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर मुंबईत ही सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी एका वकिलाने न्यायालयात माहिती दिली की, वाझे यांचा मासिक पगार सध्या दरमहा सुमारे ९० हजार रुपये आहे. त्यानंतर न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी वाझेंकडील गाड्यांची यादी न्यायालयात वाचून दाखवली. या यादीनुसार, वाझे यांच्याकडे बीएमडब्ल्यू (BMW) आणि मर्सिडीजसारख्या (Mercedes) एकूण ५ अत्यंत महागड्या लक्झरी गाड्या आहेत.

या सुनावणीत सॉलिसिटर जनरल यांनी दुजोरा दिला की, एका एपीआयच्या मालकीची मर्सिडीज आहे, पण खुद्द पोलीस आयुक्तांकडेही (CP) स्वतःच्या मालकीची मर्सिडीज नाही. यावर, एका एपीआयकडे मर्सिडीज असणे ही पोलीस आयुक्तांसाठी अतिशय चिंतेची आणि गंभीर बाब असायला हवी होती, असे मत न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच, सचिन वाझे मर्सिडीजने दुसऱ्या गेटवरून थेट मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात येत असत आणि तिथून थेट ‘वर्षा’ बंगल्यावर जात असत, असा एका साक्षीदाराचा जबाबही न्यायालयाने यावेळी नमूद केला.

सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर सकाळच्या सत्रात तब्बल तीन तास सुनावणी चालली. सकाळच्या सत्रानंतर न्यायालयाचे कामकाज स्थगित करण्यात आले असून, दुपारी या जामीन अर्जावर पुढील सुनावणी घेतली जाणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सुनावणीदरम्यान एका वकिलाने माहिती दिली की, सचिन वाझे यांचा मासिक पगार सध्या दरमहा सुमारे ९० हजार रुपये आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही