Ayurvedic Tips | केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर वापरा ‘या’ आयुर्वेदिक औषधी

Ayurvedic Tips | टीम महाराष्ट्र देशा: निरोगी, दाट आणि मजबूत केस प्रत्येकालाच हवे असतात. मात्र अनियमित जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केस गळतीची समस्या दिवसेंदिवस वाढत जाते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक महागडे शाम्पू आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरतात. पण हे उत्पादन केसांना हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांची मदत घेऊ शकतात. हे आयुर्वेदिक उपाय केल्याने केस गळतीची समस्या सहज दूर होऊ शकते आणि केस निरोगी राहू शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील औषधी वनस्पतींची मदत घेऊ शकतात.

आवळा (Amla-Ayurvedic Tips For Hair Care)

आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये विटामिन, मिनरल, ओमीनो ॲसिड, फॅटी ॲसिड इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे घटक केस मजबूत बनवण्यास मदत करतात. त्याचबरोबर आवळ्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म टाळूवरील घाण दूर करून कोंडा दूर करतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवळ्याचा रस मिसळून केसांना लावावा लागेल. एक तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. नियमित याचा वापर केल्याने केस गळतीची समस्या कमी होऊ शकते.

मेथी दाणे (Fenugreek seeds-Ayurvedic Tips For Hair Care)

कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. कोरफडीमध्ये विटामिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. कोरफडीच्या मदतीने टाळूमधील रक्ताभिसरण वाढते आणि केसांना पोषण मिळते. यासाठी तुम्ही थेट कोरफडीचा गर केसांना लावू शकतात.

भृंगराज (Bhringraj-Ayurvedic Tips For Hair Care)

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी भृंगराज एक रामबाण उपाय मानला जातो. भृंगराजमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन आढळून येते, जे  केस मजबूत आणि निरोगी करण्यास मदत करते. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही भृंगराज तेलाने टाळूची मसाज करू शकतात. या तेलाच्या मदतीने केस गळती थांबू शकते.

केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करू शकतात. त्याचबरोबर दातांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक उपाय करू शकतात.

मोहरीचे तेल आणि मीठ (Mustard oil and salt-For Teeth Care)

मोहरीचे तेल आणि मीठ वापरून दातांवरील पिवळेपणा दूर करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला दीड चमचा मिठामध्ये दोन चमचे मोहरीचे तेल मिसळून घ्यावे लागेल. या पेस्टच्या मदतीने तुम्हाला हलक्या हाताने दात स्वच्छ करावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने तोंडातील बॅक्टेरिया दूर होतो आणि त्याचबरोबर दातही चमकू लागतात.

मीठ आणि लिंबू (Salt and lemon-For Teeth Care)

मीठ आणि लिंबाच्या मदतीने दात स्वच्छ करता येऊ शकतात. या दोन्ही गोष्टींमध्ये आढळणारे गुणधर्म दातांवरील पिवळेपणा दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला दीड चमचा मिठामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला दात हलक्या हाताने घासावे लागतील. नियमित या मिश्रणाने दात घासल्यावर तुम्हाला तुमच्या दातांमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.