Supriya Sule | मुश्रीफांवर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे आक्रमक, म्हणाल्या, “त्यांना जागतिक उच्चांक मोडायचा असेल”

Supriya Sule | मुंबई : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Action) यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेसकडून नाना पटोले (Nana Patole), खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“देशमुखांच्या केसमध्ये ईडी, सीबीआयकडून वर्ल्ड रेकॉर्ड”

“हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा कारवाईचे आश्चर्य नाही, अनिल देशमुखांच्या केसमध्ये ईडी, सीबीआयकडून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. 109 वेळा छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे ईडी सीबीआयने विक्रम केला होता तो मोडायचा असेल ही शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्यांदा घरी जात आहे, तर पहिल्या 2 कारवायांमध्ये काय झालं याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

“ईडी सीबीआयच्या 95 टक्के कारवाई या विरोधकांवर”

“वारंवार केंद्र सरकारकडून विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. मात्र, आता ही शंका न राहता खरंच त्या दिशेने पाऊल जात असल्याचे दिसून येत आहे. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे घटक आहेत. देशमुख, खडसे, राऊत, नवाबाभाई असतील त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, त्याच पद्धतीने कारवाई होत आहे. देशातील ईडी सीबीआयच्या 95 टक्के कारवाई या विरोधकांवरील आहेत. संविधानाचा सन्मान न करता केंद्र सरकार काम करत आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Supriya Sule’s reaction after ED action against Hasan Mushrif

”काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत घर आणि कारखान्यावर छापेमारी केली. आयकरनेही धाडी घातल्या होत्या. त्यांच्यावर खोटे गुन्हेही दाखल केले होते. यावरून स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. उच्च न्यायालयाने कालच कोणत्या प्रकारे ताशेरे ओढले आहेत ते लक्षात घेणं आवश्यक होतं. एकाच ठिकाणी धाडी टाकणे, त्रास देणं का तर विरोधात आहे म्हणून. गेल्या दोन वर्षांपासून त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधांमधील लोकांवर कारवाई होत आहे. सत्ताधाऱ्यांची चौकशी करत नाही. अर्जाची दखल घेतली जात नाही”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.