🕒 1 min read
तुम्ही जर विकेंडच्या पार्टीचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्या ‘मूड’वर पाणी फेरू शकते. बजेट सादर झालं की सर्वात आधी चर्चा होते ती म्हणजे स्वस्त काय आणि महाग काय? पण यंदाच्या बजेटनंतर (Budget 2026-27) ‘शौकिनां’च्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागण्याची चिन्हं आहेत. मद्यप्रेमींसाठी (Liquor Price) एक मोठी बातमी समोर आली असून, दारूच्या किमती वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारने २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. जरी दारूवरील कर (Tax on Liquor) हा राज्यांचा विषय असला, तरी केंद्राच्या निर्णयांमुळे आणि विविध उपकरांमुळे (Cess) दारूच्या मूळ किमतीवर परिणाम होतो. मिळालेल्या माहितीनुसार, मद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसणार आहे.
Liquor Price Hike
जर तुम्ही १००० रुपयांची बाटली खरेदी करत असाल, तर आता त्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील. १००० रुपयांच्या दारूच्या बाटलीमागे साधारण ५० ते १०० रुपयांची वाढ होऊ शकते. म्हणजेच जी बाटली आधी १००० रुपयांना मिळायची, ती आता १०५० ते ११०० रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, अंतिम दर हे राज्य सरकार आणि तिथले स्थानिक कर ठरवतील, पण दरवाढ अटळ मानली जात आहे.
फक्त दारूच नाही, तर ‘सुट्टा’ मारणाऱ्यांनाही महागाईचा चटका बसणार आहे. सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. १० रुपयांना मिळणाऱ्या सिगारेटसाठी आता २ ते ३ रुपये जास्त मोजावे लागू शकतात. त्यामुळे आता पार्टी करायची झाली, तर खिशात जास्त पैसे ठेवावे लागतील, हे नक्की!
📌 महत्वाच्या बातम्या
- “जे BCCI ला जमलं नाही, ते ‘आतंकवादी’ टीमने केलं…”; पाकिस्तानच्या निर्णयावर प्रियंका चतुर्वेदींचा सणसणीत टोला!
- बजेटनंतर सोन्याचा ‘धोबीपछाड’; एकाच दिवसात ५८०० रुपयांनी भाव घसरले, चांदीचीही दाणादाण!
- शाहीद कपूरचा बॉलिवूडला ‘घरचा आहेर’; म्हणाला, “येथे आता चांगले सिनेमेच…” वक्तव्याने खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










