Share

“जे BCCI ला जमलं नाही, ते ‘आतंकवादी’ टीमने केलं…”; पाकिस्तानच्या निर्णयावर प्रियंका चतुर्वेदींचा सणसणीत टोला!

पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये भारतासोबत खेळण्यास नकार दिल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी तिखट प्रतिक्रिया दिली. “आयसीसीने दंड लावावा म्हणजे त्यांना पुन्हा कर्जासाठी IMF कडे जावं लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.

Published On: 

Priyanka Chaturvedi Slams Pak: "त्यांना पुन्हा भीक मागावी लागेल!"; भारताशी न खेळण्याच्या निर्णयावर भडकल्या

🕒 1 min read

भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना म्हटलं की दोन्ही देशांतील चाहत्यांचा ‘बीपी’ वाढतो. पण यावेळी हा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा मैदानात सुरू होण्याआधीच चांगलाच तापला आहे. कारण, पाकिस्तानने पुन्हा एकदा आपलं रडगाणं गात भारतासोबत खेळण्यास चक्क नकार दिलाय! ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्ड कप २०२६ (T20 World Cup 2026) मध्ये पाकिस्तान सहभागी होणार असला, तरी १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणाऱ्या भारता विरुद्धच्या मॅचवर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. यावरून आता भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पाकिस्तानला चांगलाच आरसा दाखवला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर त्यांनी अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “चांगलं झालं! जे काम BCCI ला जमलं नाही, ते आता या ‘आतंकवादी’ टीमने स्वतःहून केलंय.”

Priyanka Chaturvedi Slams Pak

फक्त एवढंच बोलून त्या थांबल्या नाहीत, तर पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवर बोट ठेवत त्यांनी पुढे लिहिलं, “आयसीसीने पाकिस्तानवर इतका दंड ठोठावला पाहिजे की, तो दंड भरण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा IMF आणि वर्ल्ड बँकेकडे भीक मागण्यासाठी जावं लागेल.” प्रियंका चतुर्वेदींच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांच्या बैठकीनंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचं आणि राजकीय तणावाचं कारण देत पाकिस्तानने १५ फेब्रुवारीचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) याबाबत आयसीसीला कोणतंही अधिकृत पत्र पाठवलेलं नाही. पीसीबीचे चेअरमन मोहसिन नकवी यांनी याआधीच आयसीसीवर ‘बीसीसीआय’च्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. आता आयसीसी यावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या