Share

Satyajeet Tambe | “मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण आता…”; सत्यजीत तांबेंनी स्पष्ट केली भूमिका

🕒 1 min readSatyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सत्यजीत तांबेंनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी आपल्या बंडखोरीचे कारण देखील स्पष्ट केले आहे. “मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलो आहे. टीडीएफ सारख्या संस्थेसह … Read more

Published On: 

🕒 1 min read

Satyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सत्यजीत तांबेंनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी आपल्या बंडखोरीचे कारण देखील स्पष्ट केले आहे.

“मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलो आहे. टीडीएफ सारख्या संस्थेसह इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. या सगळ्याचा विचार करून मी अपक्ष निवडून आलेलो असल्यामुळे मी भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका असल्याचे वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले आहे. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण आमदार म्हणून अपक्ष म्हणूनच काम करणार आहे”, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.

“निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी करणार असल्याचे पक्षातील वरिष्ठाना सांगितले आहे. मात्र वडील आमदार असल्याने तुम्हाला तिकीट देता येणार नसल्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली. त्यांनतर जे राजकरण सुरु झालं, तांबे परिवाराला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचलं गेलं, यात बाळासाहेब थोरात यांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला”, असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

“निवडणुकीच्या काळात अनेक शिक्षक संघटना आम्हाला पाठिंबा दिला आहे. टीडीएफ आणि शिक्षक भारतीसह अनेक संघटनांनी पाठिशी उभे राहून आम्हाला मदत केली. त्यामुळे या पुढील काळात देखील मी अपक्ष म्हणूनच काम करणार आहे. या सगळ्या संघटनांनी मदत केल्याने निवडणूक जिंकलो आहे, मी काँग्रेसमध्येच आहे, मात्र आमदार म्हणून भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका आहे.

“लोकहिताचे काम करण्यासाठी वेळोवेळी जे जे सरकार असेल, त्या सरकारकडून मदत घेईल, विरोधी पक्ष नेत्यांकडे जाईल, सगळ्यांकडे जाईल, मार्गदर्शन घेईल. शरद पवार सगळ्यात पहिली भूमिका घेतली का हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे काँग्रेसने अंतर्गत मिटवावा परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष खऱ्या अर्थाने करण्यात आलं आणि हे सगळं राजकारण झालं. मात्र आता ही माझी शेवटची प्रेस आहे, आता काम करायचंय. त्यामुळे राजकारणाच्या बाहेर जाऊन आता काम करणार आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात होईल. लोकांनी, मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला असून त्यांच्यासाठी काम करायचं. आता पूर्ण वेळ लोकांसाठी काम करत सुरुवात करणार आहे” असेही सत्यजित तांबे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!