Satyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता”, असा गंभीर आरोप सत्यजीत तांब यांनी केला आहे. “माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही” असा सवाल सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
“पण जेव्हा मी आमचे पक्षश्रेष्ठी एच के पाटील यांना भेटून मला संधी द्या, असं सांगितलं. मला संघटनेत एखादं पद किंवा जबाबदारी मागितली होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर विधान परिषदेची निवडणूक लढा असं सांगण्यात आलं, असं जेव्हा एच के पाटील बोलले तेव्हा मला प्रचंड संताप आला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांच्या जागेवर जर मला निवडणूक लढवायची असती, तर मी २२ वर्षे संघटनेसाठी जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं”, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
“मला पक्षाने किंवा संघटनेनं काहीतरी द्यावं, अशी मानसिकता आहे, वडिलांच्या जागी निवडणूक लढवावी, अशी माझी मानसिकता नाही, हे मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं, पण दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही, तू वडिलांच्या जागी प्रयत्न कर, असा सल्ला ते मला देऊ लागले, याला माझा पूर्णपणे विरोध होता,” अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबेंनी ( Satyajeet Tambe Press ) दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त
- Congress | “सत्यजीत तांबे आमचेच, झालं गेलं महाभारत विसरून…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा
- INC | “सरकार आधीच अस्थिर, मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कोलमडेल”; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
- Shivsena | वरळीतून लढवून दाखवण्याचं ठाकरे गटाचं चॅलेंज शिंदे गटाने स्विकारलं; ‘या’ रणरागिणीने उचलला विडा
- Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे