Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त

Shailesh Tilak | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“20 वर्षे बरोबरीने काम करणाऱ्या पुणे शहरातील ताईंच्या सहकार्‍यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती. इतरांनी उमेदवारी मागितली नसती तर मुक्ता टिळकांना ती खरी श्रद्धांजली लाभली असती, मला आज खूप दुःख झालं.  मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुढील निवडणुकीचा काळ साधारणपणे सव्वा वर्षाचा राहिला आहे. तसेच त्यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी कुटुंबीयांना द्यावी, अशी इच्छा पक्षाकडे बोलून दाखवली होती. तसेच, आजवरच्या घटनांमध्ये कुटुंबीयांपैकी एकाला संधी देण्यात आल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. हेच आम्हाला देखील वाटत होते. ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष निष्ठा जपली, मात्र पक्षाच्या नेतृत्वाने वेगळा विचार केला असून, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा”, असं म्हणत रासनेंना शुभेच्छा तर दिल्या मात्र उमेदवारी न दिल्याने नाराजी देखील व्यक्त केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पक्ष त्यांना सन्मानाचे स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे”, अशी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या