Share

Chandrakant Patil | भाजपने कसब्यातून मुक्ता टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण … Read more

Published On: 

Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. या उमेदवारीबाबत आता भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी स्पष्टकरण दिले आहे.

“शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पक्ष त्यांना सन्मानाचे स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे”, अशी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.

उमेदवारीवरून जगताप कुटुंबियांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. याबाबत विचारलं असता, “जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. “लोकांनी यााबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान आहे, पण त्याने काल समजदारीची भूमिका घेतली आणि आमच्या कुटंबात कोणताही वाद नसल्याचे म्हटलं. मी नेहमी सांगतिलं आहे की जर अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. आज मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install