Ram Shinde | “शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली”; राम शिंदेंचा गंभीर आरोप

Ram Shinde | मुंबई : राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सध्या खूप जोर आला आहे. शिवसेनेच्या फुटीची राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. या फुटीचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच शिवसेना फोडण्याचं काम राज्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असल्याचा गंभीर आरोप आता भाजपचे नेते राम शिंदे यांनी केला आहे.

शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली

“या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं. सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलणाऱ्या संजय राऊतांनी यावरही बोलावं”, अस म्हणत राम शिंदे यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे

“संजय राऊत सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला पहिल्यांदा कोणी फोडण्याचा प्रयत्न केला आणि कोणी शिवसेना फोडली यावरही बोलावं. या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं. आजतागायत छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे यावरही संजय राऊतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे”, असेही राम शिंदे म्हणाले आहेत.

“संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा आहेत. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ते जे बोलत आहेत त्याला कुठलाही आधार नाही. अमित शाह हे राष्ट्रीय नेते आहेत, ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे ते राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याबद्दल अशापद्धतीचं वक्तव्य करणं संजय राऊतांचं काम राहिलेलं नाही,” असे म्हणत राम शिदेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

राऊतांच्या बौद्धिक क्षमतेची लक्तरे उडाले

“संजय राऊतांनी सकाळ-दुपार-संध्याकाळ असं दिवसातून तीन वेळा बोलून शिवसेनेचा कार्यक्रम केला आहे. ते शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शरद पवारांचे काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची दुर्दशा झाली आहे. यातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेची लक्तरे उडाले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहत आहे. त्यामुळे राऊत काय म्हणतात हे भाजपने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही,” असंही राम शिंदेंनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.