Share

‘“मुलांना इंग्रजी चालतं, मग हिंदी शिकणं गैर कसं? शिंदे गटाचा राज ठाकरेंना सवाल

Shiv Sena leader Sanjay Nirupam strongly defended the inclusion of Hindi as a compulsory language in Maharashtra schools, stating that there is nothing wrong in learning the national language. He criticized those opposing Hindi, especially pointing out the hypocrisy of leaders whose children learn English and even German, yet oppose Hindi education.

Published On: 

Sanjay Nirupam Defends Hindi, Slams Raj Thackeray MNS

मुंबई | प्रतिनिधी

हिंदी भाषा अनिवार्य केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या वादावर शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, हिंदीचा विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. “हिंदी ही देशाची भाषा आहे. ती शिकण्यात काहीच गैर नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

संजय निरुपम म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने मराठी शिकलीच पाहिजे. पण त्याचबरोबर मूलभूत हिंदी शिकणं देखील गरजेचं आहे. काही लोक इंग्रजी शिकण्यास विरोध करत नाहीत, त्यांच्या मुलांना इंग्रजी शिकवतात, पण हिंदीला विरोध करतात, हे दुहेरी धोरण आहे. काही मनसे नेत्यांची मुले इंग्रजी आणि जर्मन शिकतात, पण त्याचवेळी ते हिंदीला विरोध करतात. याला काही अर्थ नाही, असल्याचे म्हणत नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली.”

Sanjay Nirupam Defends Hindi, Slams Raj Thackeray MNS

वक्फ बोर्डासंदर्भात सुप्रीम कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर संजय निरुपम म्हणाले, “तुमच्या मंदिर ट्रस्टमध्ये बिगर हिंदू सदस्य घ्याल का, हा प्रश्नच चुकीचा आहे. कारण वक्फ ही धार्मिक संस्था नसून एक सरकारी संस्था आहे. त्यात कोणताही धार्मिक पॅनल नसतो.”

बाळासाहेब ठाकरे यांच्या AI भाषणावरून उद्धव ठाकरे गटावर टीका करत निरुपम म्हणाले, “ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झाला आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा त्यांनी विश्वासघात केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करत निरुपम म्हणाले, “ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत आहेत आणि त्याच्याच दिशेने काम करत आहेत.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही