Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात (Climate) सातत्याने बदल होताना दिसत आहे. गेल्या महिन्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला. त्यानंतर पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता (Heat Wave) वाढत असल्याचा चित्र बघायला मिळालं. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात 7, … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात (Climate) सातत्याने बदल होताना दिसत आहे. गेल्या महिन्यामध्ये राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला. त्यानंतर पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता (Heat Wave) वाढत असल्याचा चित्र बघायला मिळालं. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात 7, 8, आणि 9 एप्रिल रोजी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची अजून काढणी बाकी आहे. तर अनेक शेतकऱ्यांची हळद, मका, कांदा इत्यादी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 5 एप्रिलच्या आधी सर्व पिकांची काढणी करून घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे.

राज्यात ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता (There is a possibility of heavy rain in these districts of the state)

राज्यामध्ये अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, संभाजीनगर, परभणी, जळगाव, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 7, 8 आणि 9 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही