Share

IPL 2023 | पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्याला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू संघातून बाहेर?

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: काल (31 मार्च) इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पहिला सामना पार पडला. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans GT) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super King CSK) विजय मिळवून आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पहिल्या विजयानंतर गुजरातला मोठा धक्का बसला. पहिल्या सामन्यानंतर संघातील दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरात टायटन्सचा खेळाडू आणि न्युझीलँड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. विलियम्सन काल झालेल्या सामन्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते.

चेन्नईचा (IPL 2023) सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने तेराव्या षटकात हवेत शॉट मारला होता. या शॉटचा झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना विलियम्सनला ही दुखापत झाली आहे. गुजरातचे प्रशिक्षक गॅरि कर्स्टन स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना म्हणाले आहे की, विलियम्सनचीही दुखापत खूप गंभीर आहे.

विलियम्सनला या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागू शकतो. विलियम्सनच्या या दुखापतीमुळे कर्स्टनच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण विलियम्सनला पुढे एकदिवसीय विश्वचषक देखील खेळायचा आहे.

महत्वाच्या बातम्या

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: काल (31 मार्च) इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पहिला सामना पार पडला. आयपीएल 2023 …

पुढे वाचा

Sports Cricket

Join WhatsApp

Join Now