Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!

Hair Oil | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला लांब, दाट आणि मजबूत केस हवे असतात. केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. त्याचबरोबर बदलती जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अकाली पांढरे केस होण्याची समस्या सुरू होते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक मेहंदीचा वापर करतात. मेहंदीच्या वापरामुळे केस कोरडे व्हायला लागतात. त्यामुळे मेहंदी लावल्यानंतर केसांना योग्य तेल लावणे खूप आवश्यक आहे. केसांना योग्य प्रकारे तेल लावल्यावर केस कोरडे होत नाही. त्याचबरोबर नियमित केसांना तेलाने मसाज केल्याने केस निरोगी राहू शकतात. मेहंदी लावल्यानंतर तुम्ही केसांना निरोगी ठेवण्यासाठी खालील तेलाचा वापर करू शकतात.

मोहरीचे तेल (Mustard oil-Hair Oil)

मोहरीचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. मोहरीच्या तेलाच्या मदतीने केसांचा कोरडेपणा सहज दूर होऊ शकतो. त्याचबरोबर मोहरीचे तेल वापरल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ जलद होते. त्यामुळे केसांना मेहंदी लावल्यानंतर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतात.

खोबरेल तेल (Coconut oil-Hair Oil)

केसांची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरू शकते. केसांना नियमित खोबरेल तेल लावल्याने केसांच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. केसांना मेहंदी लावल्यानंतर तुम्ही खोबरेल तेल लावू शकतात. खोबरेल तेल केसांमधील कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर खोबरेल तेलामध्ये आढळणारे गुणधर्म केस गळतीची समस्या दूर करू शकतात.

बदामाचे तेल (Almond oil-Hair Oil)

केसांची काळजी घेण्यासाठी बदामाचे तेल उपयुक्त ठरू शकते. बदामाच्या तेलामध्ये आढळणारे विटामिन ई केस गळती थांबवण्यास मदत करतात. केसांना मेहंदी लावल्यानंतर बदामाचे तेल लावल्याने केसांना पोषण मिळते आणि ते चमकदार होतात. त्याचबरोबर केसांच्या वाढीस चालला देण्यासाठी बदामाचे तेल उपयुक्त ठरू शकते.

केसांना मेहंदी लावल्यानंतर तुम्ही वरील तेलांचा वापर करू शकतात. त्याचबरोबर पाण्यामध्ये केळीची पाने उकळून प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते (The immune system remains strong-Banana Leaves Water)

रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही केळीच्या पानांचे पाणी पिऊ शकतात. या पानांचे उकळून सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकतात. या पाण्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करतात. परिणामी तुम्ही सर्दी-खोकला इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for skin-Banana Leaves Water)

पाण्यामध्ये केळीची पाने उकळून प्यायल्याने त्वचा निरोगी राहू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराईस ठेवतात. त्याचबरोबर या पाण्याचे नियमित सेवनाने तुमची त्वचा एलर्जी, पुरळ इत्यादी गोष्टीपासून दूर राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.