Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited), मुंबई यांच्यामार्फत भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2023/ORS/

जाहिरात पाहा (View ad)

https://www.rcfltd.com/files/Apprentice%20Advt%202023%20(31_03_2023).pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.rcfltd.com/

महत्वाच्या बातम्या