Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती; नामांतरावरून एमआयएम- मनसे कार्यकर्ते भिडले

Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती  संभाजीनगर : राज्य आणि केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘छत्रपती संभाजीनगर’ ( Chhatrapati Sambhajinagar ) नावाला परवानगी दिली. यानंतर या नावाला  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी  विरोध केला होता. त्या विरोधात जलील यांनी साखळी उपोषण केले. उपोषणात औरंगजेबाचा फोटो देखील होता. यामुळे संभाजीनगर येथे वाद शिगेला पोहचला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी कॅन्डल लाईट मोर्चा देखील काढला. अशातच आता ‘छत्रपती  संभाजीनगर’ नावाला समर्थन देत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असं करण्याला केंद्राने मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे एमआयएमने या नावाला विरोध दर्शवला आहे. छत्रपती संभाजीनगर या नावाला पाठिंबा देत मनसेने छत्रपती संभाजीनगर मध्ये  मोर्चा काढला . यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते भिडले.  त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त शहरात ( Chhatrapati Sambhajinagar ) आहे.

महत्वाच्या बातम्या – 

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.