Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर संशय आहे. त्याच्यावर मकोकाअंतर्गत (Macoca to Walmik Karad) कारवाई देखील सुरु आहे. परंतु, तो याप्रकरणी दोषी सापडतो की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. अशातच आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
विष्णू चाटेने तपासाची दिशा बदलली असे बोलले जात आहे. यापूर्वी एसआयटीच्या तपासमध्ये, विष्णू चाटे (Vishnu Chate) हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगण्यात आले होते. परंतु आता सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) हा हत्येचा आणि कटाचा मुख्य आरोपी आहे, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे टोळीचा प्रमुख का बदलला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, ज्यांच्या मोबाईलवर विष्णू चाटेने फोन केला आणि वाल्मिक कराड बोलतील, असं सांगितले. ते आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंग मिळाले असल्याचे अगोदरच एसआयटीने (SIT) कोर्टाला सांगितलं आहे. परंतु, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विष्णू चाटेवर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Santosh Deshmukh Case Update
त्यामुळे आता विष्णू चाटेच्या हरवलेल्या मोबाईलवरुन तपास अडकला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच एसआयटीच्या तपासामध्ये आणखी कोणते नवीन मुद्दे समोर येतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut यांचा मोठा दावा, म्हणाले; “Walmik Karad बाबत कोणताच निर्णय होणार नाही, काही दिवसांनी…”
- धक्कादायक! Baba Siddique यांच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग केली आणि भलतंच घडलं
- Ajit Pawar घेणार मुंडेंचा राजीनामा? उद्या होणार महत्त्वाचा निर्णय, Anjali Damania यांचा गौप्यस्फोट