Share

Ajit Pawar घेणार मुंडेंचा राजीनामा? उद्या होणार महत्त्वाचा निर्णय, Anjali Damania यांचा गौप्यस्फोट

by MHD
Will Ajit Pawar accept Dhananjay Munde resignation, Anjali Damania big blast

Ajit Pawar । मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा वाल्मिक कराड (Walmik Karad) हा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) सातत्याने मुंडे आणि कराडवर गंभीर आरोप करत आहेत. आज त्यांनी याचसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

“धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविरोधात अजित पवार यांना पुरावे दिले आहेत. या दोघांचेही आर्थिक संबंधांची त्यांना माहिती दिली आहे. याबाबत अजित पवार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान ते मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील. जर अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जाणार, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.

त्यामुळे आता या पुराव्यांवरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर त्यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता अजित पवार, धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरते.

Anjali Damania on Dhananjay Munde

दरम्यान, वाल्मिक कराड याच्यानंतर एका गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँग (Akshay Athawale Gang) विरोधात पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गँगच्या अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांच्याविरोधात मकोका लावला असल्याने याची बीडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Social activist Anjali Damania has met Deputy Chief Minister Ajit Pawar over Minister Dhananjay Munde resignation.

Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now