Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली असून अजूनही एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. अशातच आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) च्या मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सीक विभागाने रिकव्हर केला असून त्यानूसार पुढील तपास केला जाणार आहे. दरम्यान, सुदर्शन घुलेचे 2 फोन जप्त केले असून त्यापैकी एका फोनचा डेटा रिकव्हर झाला आहे.
आज न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सुदर्शन घुले याच्यावर एकुण 09 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील आरोपींनी एकत्रितरित्या बरेच गुन्हे केलेले असून दाखल गुन्हा व संबंधीत गुन्हे याबाबत तपास पोलीस करणार आहेत.
Walmik Karad trouble beacause of Sudarshan Ghule
दरम्यान, एसआयटीकडून सुदर्शन घुले याला पोलीस कोठडी मिळवण्यासाठी बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता. यावेळी सुनावणीदरम्यान, न्यायालयाकडून त्याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :