Suresh Dhas । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्या विरोधात काही महत्त्वाचे पुरावे सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे.
“वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे जे पठ्ठे आहेत त्यांची तक्रार उद्या मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. त्या 150-200 पोलिसांची बदली झाली पाहिजे. कारण ते कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आकाची सेवा करायला पोलिसांना जेलमध्ये पाठवलं जाते,” असा गंभीर आरोप धस यांनी केला आहे.
“पोलीस दलातील आकाचे प्रेमी सध्या अरेरावीची भाषा बोलत असून त्यांनीच करुणा मुंडे यांच्या वाहनामध्ये बंदुका ठेवल्या होत्या. पोलीस अधीक्षकांनी या लोकांना अजूनही सेवेत कसं काय ठेवलं आहे? इतक्या शांत आणि थंड पद्धतीनं काम केल्यावर बीड जिल्हा कसा कन्ट्रोल होणार?” असा सवाल देखील धस यांनी उपस्थित केला.
Suresh Dhas target Walmik Karad
दरम्यान, सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) कोणत्या पोलिसांच्या यादी देणार आहेत? आणि फडणवीस त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सुरेश धस यांच्या आरोपांमुळे कराडला मदत करणारे पोलीस अडचणीत येऊ शकतात, असे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :