Share

“Walmik Karad खडा तो वो सरकारसे बडा, आरोपींची रात्री…”; Jitendra Awhad यांचा मोठा गौप्यस्फोट

by MHD
Jitendra Awhad statement on Walmik Karad

Walmik Karad । वाल्मिक कराड याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सध्या त्याच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई सुरु आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर मोठा खुलासा केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“हॉस्पिटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे-मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते,” असा दावा आव्हाड यांनी केला आहे.

“एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत ! अर्थात, तो वाल्मिक कराड आहे. वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा!! थोडी तरी लाज बाळगा,” असे म्हणत आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Jitendra Awhad on Walmik Karad

दरम्यान, आव्हाड यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Jitendra Awhad has targeted the government over Walmik Karad, this has once again ignited the political atmosphere.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now