Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे केले जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकूण ८ आरोपींना अटक केली असून एक आरोपी अजूनही फरार आहे. अशातच आता संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवाला (Santosh Deshmukh Postmortem Report) वर संशय व्यक्त केला जात आहे.
यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी मोठी मागणी केली आहे. “बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या निगराणीखाली संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन झालं असल्याने त्यांनी याबाबत माहिती दिली पाहिजे,” अशी मोठी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी उडी घेत तृप्ती देसाई (Tripti Desai) यांनी फेसबुकवर एका पोस्टद्वारे एक यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांची नावे असल्याचा दावा त्यांनी केला असून गृहमंत्रालयाने यातील नावांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Murder Case
एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शवविच्छेदनाविषयी संबंधित डॉक्टर काय प्रत्युत्तर देतात? यावर गृहमंत्रालय काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तसेच या तपास पारदर्शीपणे सुरु आहे का? असाही सवाल उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :