Walmik Karad । वाल्मिक कराड याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सध्या त्याच्यावर मकोका कायद्यांतर्गत (Macoca to Walmik Karad) कारवाई सुरु असून लवकरच त्याची संपत्ती जप्त होऊ शकते. हा कराडसाठी मोठा धक्का आहे, असे बोलले जात आहे.
अशातच आता आणखी एका खून प्रकरणात वाल्मीक कराड याच्यावर आरोप केले जात आहेत. बीड शहरात सौरभ भोंडवे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने (Saurabh Bhondve murder case) पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यामुळे बीड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
13 ऑगस्ट 2024 रोजी सौरभ भोंडवे आपल्या मित्रांसोबत उखंडा तलावाजवळ गेला तो परत आलाच नाही. पीडित कुटुंबाला न्याय पाहिजे असून पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली नाही. सौरभ भोंडवे (Saurabh Bhondve) यांच्या वडिलांच्या मते सौरभचा मित्र गोरख आघाव, संभाजी जायभये, आणि सागर जाधव यांनी खून करून मृतदेह तलावात फेकून दिला.
Saurabh Bhondve murder case update
वाल्मिक कराड याच्या दबावामुळे पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही. याउलट त्यांनी आम्हालाच धमक्या दिल्या असून आम्हाला न्याय द्या, अशीही मागणी सौरभ भोंडवे यांचे वडिल शिवाजी भोंडवे यांनी नुकतीच केली आहे. एकंदरीतच पोलीस दलात वाल्मिक कराड याचा हस्तक्षेप असल्याने पोलीस प्रशासनावर नागरिकांचा विश्वास उरला नाही. आरोपींवर कारवाई होऊन दोषी पोलिसाची चौकशी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :