Chandrakant Patil । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत. याप्रकरणी दररोज धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. याच प्रकरणी सध्या अटकेत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळातून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे समर्थ असून त्यांना जर वाटले या प्रकरणात तथ्य आहे तर ते धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावतील,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
“संतोष देशमुख हत्याप्रकरणात पोलीस यंत्रणा चौकशी करत असून चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. इतकेच नाही तर निवृत्त न्यायाधीशांची समिती देखील नेमली आहे. वाल्मिक कराड याच्यासह आरोपींना मकोका लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यात पर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु आहे. वाल्मिक कराड याला 302 च्या गुन्ह्यात घेतील,” असेही वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
Chandrakant Patil on Dhananjay Munde resignation
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. यामुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरु असलेल्या तपासाकडे विशेष लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :