Anjali Damania । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) चे पोट दुखायला लागल्याने त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु आता कराड याला रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्याचा संशय निर्माण झाला आहे.
कारण जिल्हा रुग्णालयात आरोपींसाठी स्वतंत्र कोठडी असून कराडला मिनी आयसीयू असलेल्या चकाचक सर्जिकल वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. विशेष म्हणजे त्याला या वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवले होते. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वक्तव्य केले आहे.
“ज्या व्यक्तीला काहीच झालं नाही, त्याला रुग्णालयात दाखल करून आणि त्याच्यासाठी 11 रुग्णांना आपले बेड खाली करावे लावले. हे चुकीचं असून या प्रकरणात जे हॉस्पिटलचे अधिकारी, जे डॉक्टर्स असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी मोठी मागणी दमानिया यांनी केली आहे.
Anjali Damania on Walmik Karad
पुढे त्या म्हणाला की, “सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात हे राजकीय इन्कलाइन पर्सन आहेत. त्यांना लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवायची होती. पण त्यापूर्वी त्यांची नाशिकला बदली झाली. त्यानंतर परत मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला झाली,” असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :