Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात मोठे बंड करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीमध्ये बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राज्यात महायुतीला घवघवीत यश संपादन करण्यात यश आले आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. परंतु आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद नको असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते. आम्ही सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली, त्यांनी आमचा मान ठेवत या पदाचा स्वीकार केला,” असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
Gulabrao Patil on Eknath Shinde
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आता गुलाबराव पाटील यांच्या खुलास्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. यावरून नक्कीच विरोधक एकनाथ शिंदे यांना घेरू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :