Share

Pankaja Munde यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या; “… तर मनोज जरांगेच्या उपोषणाला भेट देईन”

Minister Pankaja Munde reaction to the ongoing hunger strike of Manoj Jarange Patil has caught the attention of political circles.

by MHD

Published On: 

Pankaja Munde Statement on Manoj Jarange Patil Strike

🕒 1 min read

Pankaja Munde । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनोज जरांगे पाटील हे त्यांचा लढा लढत आहेत, त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संवैधानिक चौकटीत बसवून त्यांच्या, कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे,” असे वक्तव्य मुंडेंनी केले.

पुढे त्या म्हणाल्या की, “मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करुन त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोप पाठवला असून मी त्यांच्या निरोपाची वाट पाहीन,” असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.

दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील हे पंकजा मुंडे यांना भेटणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जर मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्यानंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेतात का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरते.

Pankaja Munde on Manoj Jarange Patil

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?

  • मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच असून या समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जावे.
  • हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.
  • न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करून या समितीला एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी.
  • सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
  • महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या सर्वांच्या केसेस सरसकट मागे घेऊन गुन्हे रद्द करावे.
  • 10 टक्के एसईबीसी आरक्षण लागू करावे.
  • कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्यात आले होते ते कक्ष पुन्हा सुरु करावे. वंशावळ समिती, मोडी लिपी समिती व सर्व भाषेच्या अभ्यासकांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करावी.
  • महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग म्हणजेच कुणबी असून ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे आणि 2004 सालचा अध्यादेश आहे. मराठ्यांची पोटजात-उपजात कुणबी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यामुळे सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!