Sandeep Kshirsagar । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील तापले, याच मुद्द्याला हाताला धरून विरोधक देखील सरकारची कोंडी करताना दिसत आहेत. याप्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे.
संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप करत पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “वाल्मिक कराड (Walmik Karad) पोलिसांना शरण आल्यापासून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली. मुंडे मंत्रिपदावर असल्यामुळे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याने आहे. मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे’, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
पुढे त्यांनी याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्यावरही भाष्य केले आहे. “मला नाही वाटत आता कृष्णा आंधळे (Krishna Andhale) सापडेल म्हणून. जे काही, ज्या भागात घडतं आहे आणि इतिहास आहे, ते पाहून सापडायचा असता, तर आतापर्यंत पोलिसांना सापडला असता. या हत्येत ज्या आरोपींचा सहभाग आहे, त्यांची सीडीआर तपासा,” अशीही मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.
Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार आरोपी असलेला कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडला नसल्याने तो सापडणार की नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. अशातच संदीप क्षीरसागर यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :