RCB । संपूर्ण क्रिकेट विश्वाचे आयपीएल (IPL 2025) कडे लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचेही सामने रंगतदार असणार आहेत. यंदा मैदानात नवीन खेळाडू पाहायला मिळणार आहेत. परंतु, आयपीएलचे सामने सुरु होण्यापूर्वी RCB च्या अडचणी वाढल्या आहेत.
जबरदस्त बोली लावून इंग्लंडच्या तीन खेळाडूंना आरसीबीने खरेदी केले. यात फिल सॉल्ट (Phil Salt) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) यांचा समावेश आहे. परंतु, या दोन्ही खेळाडूंना भारताविरुद्धच्या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही.
ईडन गार्डन्स येथे भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलामीला आलेल्या फिल सॉल्ट याला अर्शदीप सिंगने शून्यावर बाद केले. तर दुसऱ्या सामन्यातही त्याला अर्शदीप सिंगनेच बाहेरचा रस्ता दाखवला. तर पहिल्या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोन शून्यावर आणि दुसऱ्या सामन्यात 13 धावांवर भारतीय संघाने (Team India) बाहेरचा रस्ता दाखवला.
RCB tension increased due to Phil Salt and Liam Livingstone Players
फिल सॉल्ट आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या खराब कामगिरीमुळे आरसीबी संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. जर या दोन्ही खेळाडूंना आयपीएलमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही तर संघाला यंदाही विजेतेपद मिळणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :