Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सातत्याने अनेक धक्कादायक आरोप आणि गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय समजला जातो. त्यामुळे विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच आता भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
तृप्ती देसाई (Tripti Desai) यांनी फेसबुकवर एका पोस्टद्वारे एक यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांची नावे असल्याचा दावा त्यांनी केला असून गृहमंत्रालयाने यातील नावांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
- बाळराजे दराडे बीड ग्रामीण-API
- रंगनाथ जगताप , अंबाजोगाई ग्रामीण -API
- भागवत शेलार , केज बीट – LCB
- संजय राठोड , अंबाजोगाई – additional Police
- त्रिंबक चोपने ,केज -Police
- बन्सोड ,केज -API
- कागने सतिश , अंबाजोगाई – Police
- दहिफळे, शिरसाळा-API
- सचिन सानप , परळी बिट – LCB
- राजाभाऊ ओताडे ,बीड -LCB
- बांगर बाबासाहेब, केज -POLICE
- विष्णु फड , परळी शहर – Police
- प्रविण बांगर , गेवराई-PI
- अमोल गायकवाड , युसुफवडगाव ड्रायवर Police
- राजकुमार मुंडे , अंबाजोगाई DYSP ऑफिस- police
- शेख जमिर, धारूर- Police
- चोवले , बर्दापुर – Police
- रवि केंद्रे,अंबाजोगाई- police
- बापु राऊत,अंबाजोगाई – Police
- केंद्रे भास्कर,परळी – Police
- दिलीप गित्ते , केज DYSP ऑफिस- Police
- डापकर- DYSP ऑफिस केज – Police
- भताने गोविंद , परळी -police .
- विलास खरात , वडवणी – Police.
- बाला डाकने,नेकनुर – Police
- घुगे, पिंपळनेर -API
Tripti Desai Facebook post about Walmik Karad
दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे सुरु आहे का? असाही सवाल उपस्थित होत आहे. यावर आता गृहमंत्रालय काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :