Santosh Deshmukh । सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण संपूर्ण राज्यभर चांगलेच गाजले आहे. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून याच प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यामुळे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
अशातच आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला पुन्हा एकदा एसआयटी कोठडी मिळू शकते. कारण माहितीनुसार, त्याच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. यामुळे या प्रकरणाला नवीन वळू लागू शकते.
दरम्यान, याबाबत एसआयटीने विशेष मकोका कोर्टाकडे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली असून जर कोर्टाने हा अर्ज मंजूर केला तर घुले पुन्हा एसआयटीच्या ताब्यात असणार आहे. तपासादरम्यान आणखी महत्त्वाची माहिती मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Evidence found against Sudarshan Ghule
वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून गेल्या आठवड्यात वाल्मिक कराड आणि खुनाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं. यानंतर कराडला कोर्टासमोर हजर केले होते. परंतु, एसआयटीने यामध्ये फुटेजचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीवेळी एसआयटी फुटेजचा उल्लेख करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :