🕒 1 min read
Anjali Damania । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अनेकदा त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे (Rajshree Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) विरोधात धक्कादायक दावे केले आहेत.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्या सतत करत आहेत. अशातच आता दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन,” असा दावा अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये केला आहे.
“बीडचे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? मग वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे Mahagenco शी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली आहे. हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय आमदारकी रद्द झाली पाहिजे, बघू कधी वेळ देतात,” असेही दमानिया यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अंजली दमानिया यांना भेटीसाठी वेळ देतात का? त्याशिवाय अंजली दमानिया भेटीदरम्यान कोणते पुरावे देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. या पुराव्यांवरून अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Anjali Damania will meet Ajit Pawar
दरम्यान, या प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला पुन्हा एकदा एसआयटी कोठडी मिळू शकते. कारण माहितीनुसार, त्याच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh यांच्या शवविच्छेदन अहवालावर संशय, धनंजय देशमुख यांनी केली मोठी मागणी
- Walmik Karad च्या अडचणी वाढल्या! आणखी एका खून प्रकरणात कनेक्शन समोर
- खळबळजनक! तृप्ती देसाईंनी जाहीर केली Walmik Karad च्या मर्जीतल्या पोलिसांची नावे, पहा संपूर्ण लिस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










