🕒 1 min read
Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणामुळे बीडचे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणातील आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामुळे बीडचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
अशातच आता एका गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँग (Akshay Athawale Gang) विरोधात पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गँगच्या अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांच्याविरोधात मकोका लावला असल्याने याची बीडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, 13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबार झाला होता. सहापैकी चार आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ (Shitalkumar Ballal) आणि सनी आठवले याची काही दिवसांपूर्वी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
Macoca to Akshay Athawale Gang
अशातच आता याच आठवलेवर ही कारवाई केली आहे. एकंदरीतच बीड पोलिसांनी गेल्या महिनाभरात बीड जिल्ह्यात दहशत घालणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- सुदर्शन घुलेमुळे Walmik Karad पुन्हा गोत्यात येणार? फॉरेन्सिककडून ‘तो’ पुरावा रिकव्हर
- मस्तच! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येतोय iPhone 16, कुठे मिळतेय जबरदस्त ऑफर? पहा
- Suresh Dhas यांचा खळबळजनक आरोप, म्हणाले; “आकाची सेवा करायला पोलिसांना जेलमध्ये…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










