Sanjay Raut । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सतत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधत असतात. अशातच आता राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
धनंजय मुंडे यांच्याबाबत आज कोणताच फैसला होणार नाही. वाल्मिक कराडसाठी रुग्णालयाचा एक मजला रिकामा केला. हे सर्व धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अजित पवार यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येऊन ते भाजपाच्याच गटात बसतील,” असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. न्यायमूर्ती चंद्रचूड फक्त मैदानावर खेळत राहिले. चेंडू रगडत राहिले. पण त्यांनी विकेट घेतली नाही. आपल्या देशात न्यायाची अपेक्षा ठेवता येत नाही,” असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut on Walmik Karad
दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. वाल्मिक कराड याच्याविषयी केलेल्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कराड खरोखरच राजकारणात एंट्री करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :