Rahul Kalate | 44 हजार मतं मिळवली, आघाडीचा उमेदवार पाडला, तरीही राहुल कलाटेंचं डिपॉझिट जप्त

Rahul Kalate | Chinchawad | चिंचवड : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या चिंचवड (Chinchawad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. चिंचवड निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव झाला. तर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी झाल्या आहेत. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा विधानसभेत जाण्याचा रस्ताच बंद झाला असल्याची चर्चा सर्वत्र परसली आहे.

राहुल कलाटे यांनी 44 हजार मते घेतल्यामुळे तसं सांगितलं जात आहे. ज्या राहुल कलाटेंमुळे नाना काटे यांना पराभव पत्करावा लागला, त्याच राहुल कलाटेंचं चिंचवड निवडणुकीत डिपॉझिटच जप्त झालं आहे. विषेश म्हणजे राहुल कलाटे यांना 44 हजार मते मिळूनही त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

तरीही राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार राहुल कलाटेंमुळे पडल्याचं बोललं जातं. या निवडणुकीत कलाटे यांनी 44 हजार मते घेतल्यामुळे नाना काटे यांचा पराभव झाला. तरीही कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते मिळणे आवश्यक असते. मात्र काल झालेल्या मतमोजणीमध्ये राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली आहेत.

Rahul Kalate’s deposit seized

मतदारसंघांमध्ये 2 लाख 87 हजार मतदान झाले. यापैकी 47 हजार 833 मते कोणत्याही उमेदवाराला मिळणे आवश्यक होते. मात्र, कलाटे यांना 47 हजार मतांचा पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. ही मते न मिळाल्यामुळे कलाटे यांच्यासह 28 पैकी 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या