Sanjay Raut | “शरद पवारांचा माझ्या वक्तव्याला विरोध नाही, आता लटकवा…”- संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. राऊतांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ पहायला मिळाला. दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभा सभागृहामध्ये पहायला मिळाले.

संजय राऊतांवर हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली. भाजप-शिंदे गटाच्या मागणीवरुन हक्कभंग समितीची स्थापना करण्याचं ठरवलं गेलं. या सगळ्या नाट्यमय परिस्थितीवर आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला धारेवर धरलं आहे. राऊत आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut criticize Eknath Shinde group

“मला हक्कभंगाची कोणतीही नोटीस आलेली नाही. मी विधिमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल असं काही वक्तव्य केलं नाही. जे लोक आमच्यातून फुटून गेले अशा एका विशिष्ट गटाला मी ‘चोरमंडळ’ म्हटलंय. त्याने पक्षाची चोरी करणं, धनुष्याची चोरी करणं योग्य नाही. ते वक्तव्य मी बाहेर केलं आहे. त्यामुळे हक्कभंग होतो की नाही पाहावं लागेल”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“तुरुंगात टाकून झालंय आता फासावर लटकवा”

“माझी बाजू समर्थपणे मांडेल. सर्वच त्यांना चोर म्हणत आहेत. बच्चू कडू यांना तर लोकांनी अडवून चोर म्हटलं, असं सांगतानाच मला फासावर लटकवायचं तर लटकवा. तेवढंच बाकी आहे. तुरुंगात टाकून झालं. आता फासावर लटकवा”, असा संताप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

“शरद पवारांचा माझ्या वक्तव्याला विरोध नाही”

“शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील बैठकीत माझ्या विधानावर नाराजी व्यक्त केली नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. संविधान, घटना, नियम याबाबत ते जागृत असतात. पण आम्ही एक आहोत. पवारांनी जी भूमिका मांडली ती महत्त्वाची आहे. जी हक्कभंग समिती आहे ती पक्षपाती आहे, असं ते म्हणाले. या समितीत मूळ शिवसेनेचा एकही व्यक्ती नाही. ज्यांनी तक्रार केल्या त्यांनाच न्यायाधीश करण्यात आलं आहे. हे चुकीचं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“धनुष्य नीट उचला, रावणानेही धनुष्य उचलंल होतं”

“पुन्हा एकदा आहे त्यापेक्षा शिवसेना जास्त जागा जिंकेल असं वातावरण मी कोल्हापुरात पाहिलं. आम्ही विरोधाककडे पाहतच नाही. विरोधक नाहीच आहे. आमच्या विरोधात काही लोक रस्त्यावर उड्या मारत असतात. काही वर्षाने तेही नष्ट होतील. धनुष्य नीट उचला. रावणानेही धनुष्य उचलंल होतं. त्याचं काय झालं ते रामायणातून समजून घ्या. अशी सोंगंढोंग महाराष्ट्रात चालत नाही. महाराष्ट्रात सचोटी चालते. त्यांच्या यात्रा म्हणजे पैश्यांचा खेळ असतो”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या