Uddhav Tahckeray | “वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”; उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Tahckeray | मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Bypoll Election Result) आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विजयानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

“एका चांगल्या बदलाची सुरूवात आहे”

“कसबा पेठ निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकल्याचा मला आनंद आहे. एवढ्या मोठ्या प्रभावातून कसबा बाहेर पडत असेल तर देश बाहेर पडायला काही हरकत नाही. एका चांगल्या बदलाची सुरूवात आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Reaction On Kasba result

“भाजपच्या विरोधातली मतांची संख्या वाढते आहे ही एकत्र करणं हे मोठं आव्हान आहे. मतदार जागरूक होत चालले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र राहणं आणि कसोशीने प्रयत्न करणं आवश्यक आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”

“वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण आहे हे मी बोललो होतो. तेच पुण्यात झालं. शिवसेनेचाही वापर करून फेकला. मुक्ता टिळक यांच्या घरातही तिकिट दिलं गेलं नाही त्यामुळे वापरा आणि फेका हेच समोर आलं. गिरीश बापट यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावून प्रचाराला आणलं. सहानुभूती पाहिजे पण ती पण सिलेक्टिव्ह हवी हे मतदार कधी स्वीकारत नाही”, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-