Ajit Pawar | राम सातपुतेंनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उद्देशून भाषण केल्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते चांगलेच संतापले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला आहे. सभागृहात विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राम सातपुतेंचं वक्तव्य Ram Satpute’s Statement regarding Sharad Pawar

‘मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले म्हणून मी विधानसभेत निवडून आलो, मला राष्ट्रवादीच्या शरद पवाराने आरक्षण दिले नाही’, असे वक्तव्य राम सातपुते यांनी केल्यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

‘जितेंद्र आव्हाड मला दलित आमदार म्हणून हिनवत आहेत. हो मी दलित आहे, मी हिंदू दलित आहे. माझ्या बापाने चपला शिवल्या, त्याचा मला अभिमान आहे. मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतलाय, त्याचा मला अभिमान आहे. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे. मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण दिलं नाही,’ असा उल्लेख राम सातपुते यांनी केला आहे.

Ajit Pawar Reaction on Ram Satpute’s Statement

“प्रत्येकाला आपल्या वरिष्ठ नेत्याचा अभिमान असतो. मी अनेक वर्षांपासून सभागृहात येतो, असे प्रसंग अनेकदा येतात. एकेरी उल्लेक झाला असेल, तर नवीन पायंडे पडतील. सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचेही वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर शब्दाने शब्द वाढततील. त्यामुळे राम सातपुते यांनी तात्काळ माफी मागून विषय संपवावा. मी स्वतः विरोधी पक्षनेता असतानाही अनेकदा माफी मागितली आहे. त्यामुळे कुणाचाही अपमान व्हायचे काम नाही” असं अजित पवार म्हणाले आहेत.

राम सातपुतेंची दिलगीरी – Ram Satpute

राम सातपुते यांनी दिलगीरी व्यक्त केली. ‘मी पहिल्यांदाच आमदार झालोय. बोलण्याच्या ओघातून माझ्या मी बोलून गेलो. सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं राम सातपुते म्हणाले आहेत. त्यांच्या दिलगिरीनंतर हा वाद शमल्याचं पहायला मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या-