Ravindra Dhangekar | “कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हताच”; नविर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

Ravindra Dhangekar | पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी (Kasba Bypoll Election Result) आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विजयानंतर आता काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“कसबा भाजपचा बालेकिल्ला नव्हताच”

“कसबा हा भाजपचा बालेकिल्ला नव्हता. सगळ्या पक्षामुळे भाजप निवडून येत होते. ही निवडणूक जनतेनी हातात घेतली होती. त्यांच्यामुळेच हा विजय मिळाला आहे. कसबा भाजपचा गड नाही तर हा गड जनतेचा आहे,” अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेसचे विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दिली आहे.

“या विजयाचं श्रेय फक्त जनतेला”- Ravindra Dhangekar

“या विजयाचं श्रेय मी कोणत्या नेत्याला नाही तर फक्त मायबाप जनतेला देतो. या जनतेनंच मला निवडून आणलं आहे. कसबा मागील अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला आहे त्यामुळे ही निवडणूक सोपी नव्हती. मात्र पहिल्या दिवसापासून विजय मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले होते. ही निवडणूक सोपी नव्हची मात्र जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि सोपी केली,” असंही धंगेकर म्हणाले आहेत.

‘हू ईज धंगेकर’च्या घोषणा (Who is Dhangekar)

सगळ्या जनतेचे घरी जाऊन आभार मानेन आणि मला साथ दिलेल्या नेत्यांचंही आभार मानणार आहे. त्यानंतर गिरीष बापटांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचं धंगेकर म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांकडून ‘हू ईज धंगेकर’ अशी घोषणाबाजी सुरु आहे. प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाषणात ‘हु इज धंगेकर.. तो आमच्यासमोर टिकू शकत नाही’, असं वक्तव्य केलं होतं.

“आमदार झालो तरी सर्वसामान्यांचा नेता म्हणूनच…”

“चारचाकीत मी जात नाही कारण चारचाकीने सगळीकडे जाणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा नेता म्हणून मी दुचाकीने फिरतो. हा धंगेकर आमदार झाल्यावरही बदलणार नाही जनतेसाठी हा त्यांचा रवी भाऊच राहणार”, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून धंगेकर हे आघाडीवर होते. विजयी झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फक्त काँग्रेसचेच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते हा जल्लोष साजरा करत आहे.

महत्वाच्या बातम्या-