Devendra Fadnavis | “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन” नंतर “आम्ही पुन्हा येऊ” भाग – २

Devendra Fadnavis Kasba By Election | पुणे : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीबाबत राज्यातील अनेक लोकांनी लक्ष दिलं आहे. यामुळे हि पोटनिवडणूक महाराष्ट्रात गाजली आहे. कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेद्वार रवींद्र धंगेकर ( Ravindra dhangekar ) यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या निवडणुकीत धंगेकर यांना ११ हजार मतांनी विजयी मिळवला. तर दुसऱ्या बाजूला चिंचवड मतदार संघात दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांना उमेदवारी दिली. त्याचा फायदा भाजपला झाला.

अश्विनी जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे ( Rahul Kalate ) आणि अपक्ष उमेदवार नाना काटे ( Nana Kate ) अस त्रिकुट पाहायला मिळालं. त्यानंतर अश्विनी जगताप यांनी चांगलीच लीड मिळवत ३६०९१ मतांनी विजयी मिळवला आहे. त्यानंतर अश्विनी जगताप याचं अनेकांनी प्रत्यक्ष तर सामाजमाध्यमांद्वारे अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Tweet ) यांनी देखील ट्विट करत मतदारांचे आभार मानले आहे.

फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार, म्हणाले ‘आम्ही पुन्हा येऊ’!

“कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो.

पण, एक नक्की सांगतो,
आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’! – Devendra Fadnavis

मराठी माणूस पैशात विकला जात नाही  – सुप्रिया सुळे ( Supriya Sule )

“पोटनिवडणुकीच्या विजयाच्या निमित्ताने भाजपला लोकांनी नाकारले असल्याचे सांगत मराठी माणूस पैशात विकला जात नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी धंगेकरांचं अभिनंदन केलं आहे. पैसे वाटल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवर झाला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

परिवर्तन महाराष्ट्र आणि देशात होणार – आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) 

“आज कसब्या सारख्या ठिकाणी अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता होती. अशा ठिकाणी महविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. “महाराष्ट्रात जी गद्दारी झाली आणि जे वातावरण झालं ते कोणालाच आवडलं नाही.” “३२ वर्षांनंतर ही जागा काँग्रेसच्या हाती आली आहे. यामुळे हे किती बोलकं असू शकत. हेच परिवर्तन महाराष्ट्र आणि देशात होणार” अस आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपला ‘ती’ चूक भोवली; टिळक कुटुंबात उमेदवारी दिली असती तर

कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी न दिल्याने भाजप विरोधात कसब्यात नाराजीचा सूर उमटला होता. भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न देता भाजपच्या हेमंत रासनेंना उमेदवारी दिली. पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली.

मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे पती शैलेश टिळक यांची नाराजी

“आजवरच्या घटनांमध्ये कुटुंबीयांपैकी एकाला संधी देण्यात आल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. हेच आम्हाला देखील वाटत होते. ताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष निष्ठा जपली, मात्र पक्षाच्या नेतृत्वाने वेगळा विचार केला असून, हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा”, शैलेश टिळक यांनी नाराजी देखील व्यक्त केली.

“20 वर्षे बरोबरीने काम करणाऱ्या पुणे शहरातील ताईंच्या सहकार्‍यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती. इतरांनी उमेदवारी मागितली नसती तर मुक्ता टिळकांना ती खरी श्रद्धांजली लाभली असती, मला आज खूप दुःख झालं”, असं शैलेश टिळक म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या – 

Back to top button