Maratha Reservation | मराठा समाजाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा; मालेगावमध्ये मुस्लिम लोकांनी केलं उपोषण

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | मालेगाव: राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarang) यांनी जालना जिल्ह्यामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली.

त्यानंतर मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषणाला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात सकल मराठा समाजातर्फे उपोषण सुरू करण्यात आलं होतं. त्यांच्या या उपोषणामध्ये मुस्लिम समाज देखील सामील झाला आहे.

The movement of the Maratha community was supported by the Muslim community

महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं (Maratha Reservation) आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. अशात मुस्लिम समाजाचं वर्चस्व असलेल्या मालेगाव शहरात देखील मराठा समाजाने आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला सुरुवात केली.

यादरम्यान मालेगावमध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे दिसून आले आहे. कारण मराठा समाजाच्या या उपोषणाला मुस्लिम समाजाने पाठिंबा देत राज्य सरकारला आरक्षणासाठी (Maratha Reservation) निवेदन केलं आहे. या घटनेच्या माध्यमातून राज्यात एक चांगला संदेश पसरवला जात आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात राज्यात मराठा समाजाचं हे आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे.

उपोषणाच्या 9 व्या दिवशी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं आहे.

या शिष्टमंडळात धनंजय मुंडे, अतुल सावे, उदय सामंत संदिपान भुमरे, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे, निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव यांचा समावेश आहे.

राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) कायदेशीर बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मनोज जरांगे आणि राज्य शासनाच्या शिष्टमंडळामध्ये सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe