🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन पेटत चाललं आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून जागोजागी जाळपोळ, फोडाफोडी, दगडफेक केली जात आहे.
त्यामुळं राज्यात अनेक बस डेपोतून एसटी बस सेवा रद्द करण्यात आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. 08 नोव्हेंबर 2023 रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही दिवसांपूर्वी तोडफोड झाली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.
मराठा आंदोलनाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. त्यांच्या या याचिकेनंतर मराठा समाज आणखीन संतप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कारण गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वी देखील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विरोधात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टात मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं. अशात गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या चिंतेत भर पडली आहे.
Subodh Savji commented on Maratha Reservation
दरम्यान, मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती लागू करण्याची मागणी केली आहे.
मराठा समाज आरक्षण (Maratha Reservation) मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्याचबरोबर राज्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा तरुण देखील आत्महत्या करत आहे. म्हणून ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं सुबोध सावजी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा समाज आक्रमक, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; माजी मंत्र्याची मागणी
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांना लवकर निर्णय घेण्याची गरज; प्रकृती बिघडली असताना जरांगे तिघांचा आधार घेत कसेबसे चालले
- Maratha Reservation | पप्पा घरी असावे त्यांनी आमच्यासोबत खेळावं असं आम्हाला सारखं वाटत; मनोज जरांगेंची लेक भावूक
- Maratha Reservation | राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला; शिष्टमंडळात कुणाचा आहे समावेश?
- Maratha Reservation | मराठा आरक्षण आमच्यासाठी दुय्यम स्थानी; बच्चू कडूंच्या विधानानंतर मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











