🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत चालला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे.
आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस असून आज त्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे. मात्र, तरी देखील ते त्यांचं उपोषण मागे घेण्यास तयार नाही. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी रवाना झालं आहे.
या शिष्टमंडळात अतुल सावे, उदय सामंत, संदिपान भुमरे आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहे.
त्याचबरोबर या शिष्टमंडळात राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव सुद्धा सामील असणार आहे.
हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) कायदेशीर बाजू समजून सांगणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
Bacchu Kadu commented on Maratha Reservation
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सध्या मराठा समाजाचा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा आमच्यासाठी दुय्यम स्थानी आहे.
सध्या प्रथम स्थानी आमच्यासाठी मनोज जरांगे यांची तब्येत आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते असतील तर आरक्षण मिळेल.
काल मी मनोज जरांगे यांची भेट घेतली. मी त्यांना सरकार म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून भेटलो. त्यांनी उपचार आणि पाणी घ्यावं, अशी मी त्यांना विनंती केली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आरक्षण आमच्यासाठी दुय्यम स्थानी; बच्चू कडूंच्या विधानानंतर मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता
- Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळणार? राज्यातील मोठ्या नेत्यांची दिल्लीत बैठक
- Manoj Jarange | शिंदे-फडणवीस अजून किती उशीर करणार? उपोषणाच्या 9 व्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती अत्यंत खालावली
- Maratha Reservation | राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलक आक्रमक; मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता रोको सुरू
- Maratha Reservation | मराठी रंगभूमीला बसला मराठा आंदोलनाचा फटका; आंदोलनामुळे मराठी नाट्यसंमेलन स्थगित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











