🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलक जाळपोळ, दगडफेक, रस्ता रोको, घरफोडी करताना दिसत आहे.
त्यामुळं राज्यातील बहुतांश एसटी बस डेपोतून बस सेवा बंद करण्यात आली आहे. अशात या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर सर्व पक्षीय बैठक पार पडली.
परंतु, या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा निघाला नाही. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत दाखल झाले आहे.
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहे.
आज दुपारी 3.30 वाजता देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी ही भेट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
Manoj Jarange’s agitation for Maratha reservation is going on
दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण सुरू आहे.
आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. उपोषणाच्या 9 व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असून त्यांच्या तपासण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक उपोषण स्थळी दाखल झालं आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार (Maratha Reservation) नाही तोपर्यंत अन्न आणि पाणी घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange | शिंदे-फडणवीस अजून किती उशीर करणार? उपोषणाच्या 9 व्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती अत्यंत खालावली
- Maratha Reservation | राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलक आक्रमक; मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता रोको सुरू
- Maratha Reservation | मराठी रंगभूमीला बसला मराठा आंदोलनाचा फटका; आंदोलनामुळे मराठी नाट्यसंमेलन स्थगित
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांच्या दिरंगाईमुळे दिवाळीपूर्वी एसटी बसचं निघालं ‘दिवाळ’; मराठा आंदोलनाचा एसटीला किती बसला फटका?
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन चिघळणार? पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









