Share

Maratha Reservation | मराठा आंदोलन आणखीन चिघळणार? पश्चिम महाराष्ट्रातही सापडले कुणबी दाखले

🕒 1 min readMaratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन सुरू आहे. कुणबी दाखल्याच्या पुराव्याच्या आधारे राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. अशात याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या संख्येने कुणबी दाखले सापडले आहेत. पंढरपूर … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी आक्रमक आंदोलन सुरू आहे. कुणबी दाखल्याच्या पुराव्याच्या आधारे राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.

अशात याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या संख्येने कुणबी दाखले सापडले आहेत. पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात जुने रेकॉर्ड तपासत असताना कुणबी दाखल्यांची नोंद असल्याची माहिती मिळाली आहे.

सरसकट मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. अशात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर तालुक्यात कुणबी दाखल्यांची नोंद असल्याचं समोर आलं आहे.

तर सोलापूरमधील काही राजकारण्यांनी आधीच कुणबी असल्याचे दाखले काढून घेतल्याचंही यामध्ये समोर आलं आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावात 25 पेक्षा अधिक दाखले सापडले आहे. यानंतर मराठा आंदोलक अजून संतप्त होणार असल्याच्या चर्चा  सुरू झाल्या आहे.

A delegation of the state government will visit Manoj Jarange over Maratha reservation

दरम्यान, मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी काल सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं.

आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी यावं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांनी बोलवल्यानंतर देखील कोणताही राजकीय नेता त्यांच्या भेटीला जाणार नाहीये. मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार आहे.

या भेटीदरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाजू समजून सांगणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना आपलं उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!