Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांना आता तरी जाग येणार? मराठा आरक्षणासाठी एका दिव्यांग तरुणाची आत्महत्या

Maratha Reservation | सोलापूर: राज्यामध्ये सध्या मराठा आंदोलन चर्चेत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी उपोषण सुरू केलं आहे.

आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्यामध्ये हिंसाचार घडताना दिसत आहे. जागोजागी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याच्या घटना घडत आहे.

तर दुसरीकडे आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. अशा सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात एका दिव्यांग तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

A disabled youth committed suicide for Maratha reservation

मराठा समाजाचं आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस पेटत चाललं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक मराठा तरुण आपला जीव देत आहे.

अशात काल (31 ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे एका दिव्यांग तरुणाने आत्महत्या केली आहे. विलास कृष्णा क्षीरसागर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

आत्महत्या करणाऱ्या या तरुणाचं वय फक्त 30 वर्ष होतं. जेव्हापासून मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे तेव्हापासून विलास आंदोलनात सक्रिय आहे.

सोमवारी (30 ऑक्टोबर) रात्री अकरा वाजेपर्यंत तो आंदोलन (Maratha Reservation) स्थळी बसून होता. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Rail Roko protest in Solapur over Maratha reservation

दरम्यान, मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवसेंदिवस पेटत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर काल सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे.

काल मराठी क्रांती मोर्चाने सोलापूरमध्ये रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलकांनी  रेल्वे रुळावर टायर पेटवलं. पोलिसांनी हा सर्व प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आंदोलन मागे हटण्यास तयार नव्हते. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

महत्वाच्या बातम्या