Weather Update | यंदा थंडी कमीच राहणार; हवामान खात्याने दिला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातून परतीचा पाऊस मागे फिरल्यानंतर ऑक्टोबर हिटने नागरिकांना हैराण करून टाकले होते. अशात थंडीची चाहूल लागल्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे.

राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्यामुळे थंडी वाढत चालली आहे. परिणामी उन्हाचे चटके आणि उकाडा कमी होताना दिसत आहे. अशात हवामान खात्याने थंडीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

There is a possibility of less cold in the month of November

यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याने (Weather Update) म्हटलं आहे. देशात नोव्हेंबर महिन्यातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तर राज्यात देखील किमान तापमान अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. परिणामी राज्यात थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.

राज्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अशात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात दक्षिणेकडील बहुतांश भागात त्याचबरोबर ईशान्य, पूर्व मध्य आणि पश्चिमेकडील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.

तर उर्वरित देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त (Weather Update) केला आहे. तर देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.