Share

Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांच्या दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना अजून काय सोसावं लागेल? बसनंतर मराठा संघटनांचं रेल्वे रोको आंदोलन

🕒 1 min read Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी बस फोडल्या जात आहेत. त्याचबरोबर अनेक महामार्गावर टायरची जाळपोळ देखील करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी बस फोडल्या जात आहेत. त्याचबरोबर अनेक महामार्गावर टायरची जाळपोळ देखील करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे.

यानंतर सामान्य नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अचानक बस सेवा बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागला आहे तर अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे.

अशात सामान्य नागरिकांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाने रेल रोको आंदोलन करून रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला आहे.

Rail Roko protest in Solapur over Maratha reservation

मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून दिवसेंदिवस आक्रमक होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आज सोलापूरमध्ये रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यानंतर आंदोलकांनी रेल्वे रुळावर टायर पेटवलं. पोलिसांनी हा सर्व प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते.

कालपासून सामान्य नागरिकांसाठी बस सेवा बंद करण्यात आली आहे. तर सोलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर रेल्वे सेवा देखील बंद होतील का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यात मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी आंदोलन सुरू केलं होतं.

त्यानंतर जरांगे यांनी राज्य शासनाला या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 40  दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, राज्य शासनाने या 40 दिवसांमध्ये मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय घेतला नाही.

त्यामुळे ही मुदत संपल्यानंतर मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जागोजागी दगडफेक आणि जाळपोळ सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर काल एसटी बस सेवा रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी दिरंगाई करत असल्याने सामान्य नागरिकांना अजून काय काय बघावं लागणार आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही