Maratha Reservation | आंदोलकांना त्रास झाला तर जशासतसं उत्तर दिलं जाईल; मनोज जरांगेचा शिंदे- फडणवीसांना इशारा

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | जालना: मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची दिसून आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी या संचारबंदीला विरोध दर्शवला आहे.

Manoj Jarange commented on Maratha Reservation

मनोज जरांगे म्हणाले, “राज्य शासनाने सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला हवं. मराठा समाज अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही. मराठा आंदोलकांना आंदोलन करू द्या.

लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन (Maratha Reservation) करत आहोत. त्यामुळे आमची आंदोलन मोडीत काढू नका. त्याचबरोबर 114 बंदी हटवा. आमच्या आंदोलकांना त्रास झाला तर आम्ही जशासतसं उत्तर देऊ.

बीडमध्ये जे काही सुरू आहे ते मागे घ्या. बीडमध्ये जातीयवादी अधिकारी आहेत. अधिकारी जातीयवादी नसायला हवे. मराठ्यांच्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करू नका.

आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल झाले तर मी स्वतः बीडमध्ये जाऊन बसेल. मी बीड जिल्ह्यात गेलो तर मराठा समाज तिकडे येईल. त्यानंतर तुम्हाला मराठा समाजाची ताकद कळेल.”

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांची मुलगी पल्लवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना ती भावूक झाली.

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी म्हणाली, “मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं  यासाठी माझ्या बाबांचं आमरण उपोषण सुरू आहे.

ते मराठा समाजासाठी लढा देत आहे, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. परंतु, आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटते. राज्य सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणावर (Maratha Reservation) निर्णय घ्यायला हवा. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नये. तुम्ही जर आत्महत्या केली तर आरक्षण कशासाठी आणि कुणासाठी हवं?”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe