Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी अत्यंत आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे.
एकीकडे राज्यात मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू झाली आहे.
अशात मनोज जरांगे यांचा मुलगा शिवराज आणि मुलगी पल्लवी त्यांची घरी दिवाळीसाठी वाट बघत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
Manoj Jarange’s son commented on Maratha Reservation
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे यांचा मुलगा शिवराज जरांगे म्हणाला, “62 पेक्षा जास्त दिवस झाले, बाबा घरी आले नाही.
आम्हाला त्यांच्या तब्येतीची अत्यंत काळजी वाटत आहे. तर दुसरीकडे राज्य शासन मराठा समाजाच्या आरक्षणावर (Maratha Reservation) लवकर निर्णय घेत नाहीये.
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मराठा तरुण आत्महत्या करताना दिसत आहे. सरकार त्यांचा विचार करून देखील लवकर निर्णय घेत नाही. मराठा समाजाला जर लवकर आरक्षण मिळालं तर माझे वडील लवकर घरी येतील.
Manoj Jarange’s daughter commented on Maratha Reservation
यावेळी बोलत असताना मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी जरांगे म्हणाली, “माझे बाबा बेमुदत उपोषण करत असल्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
परंतु, माझे वडील मराठा समाजासाठी लढा देत आहे, याचा मला खूप अभिमान आहे. पण त्यांचं आमरण उपोषण सुरू असल्यामुळे आम्हाला त्यांची अत्यंत काळजी वाटते.
राज्य शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) घ्यावं. त्याचबरोबर मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये. त्यांनी जर आत्महत्या केली तर आरक्षण कोणाला आणि कशाला द्यायचं?
दरम्यान, मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.
तर दुसरीकडे मनोज जरांगे यांची मुलं शिवराज आणि पल्लवी त्यांची घरी येण्याची वाट बघत आहे. सर्वत्र दिवाळीची चाहूल लागलेली असताना ते देखील त्यांच्या वडिलांची घरी येण्याची वाट बघत आहेत.
मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराच्या घशाखाली घास उतरत नसल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ketaki Chitale – एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा…; मराठा आंदोलकांना केतकी चितळेचा टोला
- Raj Thackeray | मनोज जरांगे यांना उपोषण तात्काळ थांबवण्यासाठी राज ठाकरेंचे विनंती पत्र
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? CM शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात फोनवर चर्चा
- Weather Update | राज्यात कुठं थंडीची चाहूल तर कुठं पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज
- Eknath Shinde – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकाकी; मराठा आरक्षणांवर फडणवीस-पवारांची दांडी